आतड्याचा दाहचा त्रास हा पचनसंस्थेमध्ये सर्वात जास्त आढळणारा विकार आहे.सर्व साधारण पाहणीमध्ये लोक संखेच्या 15 % इतका या विकाराचा प्रादुर्भाव आढळतो.या विकाराची मुख्य लक्षणे पुढील प्रमाणे :-
१. पोटात अधून मधून दुखणे.
२.बद्धकोष्ठता.
३. अतिसार (जुलाब) होणे.
   सर्वात महत्वाचा मुदा म्हणजे ह्या विकारात रक्ततपासणी अथवा मलतपासणी मध्ये काहीही दोष आढळत नाही. तसेच लहान व मोठ्या आतड्याची बेरियम देवून एक्सरेने तपासणी केली तर त्यातसुधा कोणताही दोष दिसत नाही.थोडक्यात म्हणजे ह्या विकारात अताड्याला सूज,अल्सर,टि. बी. कॅन्सर अथवा कोलायटिस होत नाही.वरील प्रकारे कोणताही रोग नसताना मग पोटात मात्र सतत दिवसाच्या दिवस का बरे दुखत राहते ? ह्याचे कारण आहे आतड्याचा आकुंचन प्रसारणातील किर्या मध्ये झालेला बिघाड हे होय.ह्या विकारात आतड्याचे आकुंचन नेहमीपेक्षा जास्त जोरात व दाबाने होते. त्यामूळे रुग्णांना पोटात निरनिराळ्या टिकाणी वेदना जाणवतात.अत्याधुनिक संशोधनाद्वारे आता असे सिध्द झाले आहे कि आतड्यापासून मेंदूपर्यत जाणार्या मज्जातंतु (Nerves) ह्या विकारात अधिकच संवेदनशील होतात व त्याचे रुपांतर पोटदुखीची तीव्रता वाढवण्यात होते.जर ह्या विकाराचे काही निश्चित निदान केले नाही तर अपेंडिकस पित्ताशय अथवा गर्भाशयला सूज आली आहे म्हणून पोटावर शस्त्रक्रिया करून एखादा अवयव काढण्याची शक्यता असते.पोटात दुखण्याच्या कारणाने जर वेळेवर निश्चित निदान आतड्याचा दाहाचा त्रास असे झाले तर वरील शस्त्रक्रिया टाळू शकतात.
     यास्तव आतड्याचा दहाचा त्रास हा विकार नेमका काय आहे,त्याची मुख्य लक्षणे कोणती, हे आपण पाहू.
१. कधी बद्धकोष्ठता तर कधी अतिसार होणे.
२.पोटात निरनिराळ्या भागात अधून मधून दुखणे.
३. पोटातील दुखणे चालू होताच शोचाला जाण्याची इच्छा होणे.
४. शोचास जावून आल्यावर सुद्धा कोठा साफ न झाल्याची भावना होणे.
५.शोचास कधी खडा होणे तर कधी पातळ परसाकडेच होणे.
६. कधी आव पडणे.
७.जेवणानंतर पोटात दुखण्यास सुरवात होणे.
८.पोट फुगणे किवा डब्ब झाल्या सारखे वाटणे.
९.शोचास साफ झाल्यावर बरे वाटणे,अर्थात पोटात दुखण्याचे कमी होणे अथवा थांबणे.
१०.काही रुग्णांना सकाळीच 3 ते 4 वेळा पोटात दुखून शोचास होणे व नंतर दिवसभर काही त्रास जाणवत नाही.
११.काही रुग्णांना खाल्यानंतर किवा चहा कॉफी घेतल्यानंतर लगेच शोचास जावे लागते.
१२. रात्रीची झोप मोडून शोचास जाण्याची इच्छा ह्या विकारात मुळीच आढळून येत नाही,परंतु हेच लक्षण मात्र निरनिराळ्या कोलायटिसच्या रुग्णामध्ये आढळून येते.
        थोडक्यात सांगायचे तर अनेक घटक आतड्याच्या अनियमितपणाच्या तक्रारींना सुरवात करतात.सर्वसाधारणपणे मानसिक तणाव आणि आहार दोन प्रमुख घटकामुळे वरील लक्षणांना कारणीभूत ठरतात. कॉफी अतिरीक्त मद्यपान,मसालेदार चमचमीत खाद्य पदार्थ हे आतड्यांना त्रासदायक ठरू शकतात.
        कोणत्याही वयोगटात रुग्ण डॉक्टरांस जेव्हा प्रथम भेटतो तेव्हा हि बद्धकोष्ठता तक्रार खूप जुनी असल्याचे आढळते. शोचास आठवड्यातून एक दोन वेळाच होणे.कोठा साफ होण्याच्या रेचकांचा सर्रास वापर केला जातो. मलप्रवर्ती कुठे, केव्हा,कितीवेळा होईल अशा सततच्या शंकेने रुग्ण पछाडलेला असतो. आतड्याचा दाहाच्या त्रासामध्ये बराच वेळ कुंथुन,जोर करून सुद्धा कोठा साफ होत नाही.काही वर्षातच पोटदुखी,मुरडा व वात इत्यादी आजार सुरु होतात.त्रासाची पोटातील नेमकी जागा निश्चित नसते.या वेदना काही मिनटापासून काही तासापर्यंत राहतात. ह्याचे शमन वात सुटणे,शौचास होणे किवा एनिमा द्वारे होते. कालांतराणे वेदनेची तीव्रता मूळ विकारापेक्ष्या बरीच वाढते. सततच्या पोटदुखीमुळे अकार्यक्षम पित्ताशय, अपेंडिकस किवा पोटातील इतर काही अवयवांची क्ष-किरण तपासणीनंतर शस्त्रक्रिया करून काढून टाकण्यात होते. वरील अवयव कदाचित व्याधीगास्त असूही शकतील.परंतु ते लक्षणाचे खरे कारण नसल्यामुळे त्याच्यावरील शस्त्रक्रिया पुढील निदान निश्चितपणे अधिकच अडथळे उत्पन्न करतात.
      एकूण पाहता पोटातील निरनिराळ्या अवयवाचे,उदाहरणार्थ,लिव्हर,किडनी,जठर, स्वादुपिंड,पित्ताशय,लहान व मोठे आतडे,अपेंडीक्स,स्त्रिायांमध्ये गर्भाशय,निरनिराळ्या प्रकारच्या आजारामुळे दुखणे असु शकते. पण आतड्याचा दाह हाच पोटात दुखण्यास कारणीभूत आहे किवा वरील नमूद केलेल्या अवयवात बीघाड हे कारणीभूत आहे हे कळणे फारच महत्वाचे असते आणि त्यासाठी खाली नमूद केलेल्या काही तपासण्या (TESTS) करणे आवशक असते.
१.रक्त तपासणी :-ह्यात हिमोग्लोबिनचे व निरनिराळ्या पेशीचे प्रमाण बघितले जाते.
२. मलपरीक्षा :- ह्यात अमांश व जंत बघितले जातात.
३.कोलोनोस्कोपी (दुर्बिणीने मोठ्या आतड्याची तपासणी ) :- ह्या तपासणीद्वारे मोठ्या आतड्याची तपासणी केली जाते.ह्यात मोठ्या आतड्याच्या कोणत्याही प्रकारचा आजार असेल तर तो ताबडतोब कळतो.उदाहरणार्थ : मोठ्या आतड्यांचा कॅन्सर (कर्करोग), कोलायटीस,टी.बी., अल्सर,गांठ किवा सूज इत्यादी आधुनिक उपकरणास आतड्याचा तपासणीसाठी ह्या व्हिडीयोस्कोप दुर्बिनिपेक्षा अचूक असे साधन उपलब्ध नाही. दुर्बिणीद्वारेतपासणी ’आतड्याचा दाह ’ असलेल्या रुग्णांना आतड्याचा काहीही दोष आढळत नाही व ह्या रुग्णाच्या आतड्यात दुर्बिणीद्वारे थोडीसी देखील हवा भरली तर ती त्यांना सहन होत नाही. दुर्बिणीद्वारे तपासणी केल्या नंतर डॉक्टर खात्रीपूर्वक रुग्णांना सांगू शकतात कि त्यांना पोटात होणारा त्रास हा इतर आजारामुळे नसून तो आतड्याचा दहामुळेच होतो. त्यामुळे रुग्णांना आत्मविश्वास वाढून भीती नाहीशी होते. निदान निश्चिती नंतर योग्य तो ओषधउपचार करता येतो.
       आहारावरील नियंत्रण,प्रकार,प्रमाण हा आतड्याचा दहाच्या विकारच्या उपचाराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. आहारात तंतुमय पालेभाज्या व फळे यांचा वापर आधुनिक आहार शास्त्रामध्ये सर्वात महत्वाचा उपचार आहे. ह्या तंतुमय पालेभाज्या,फळात व कोंड्यात प्रामुख्याने सेलूलोज व हेमीस्लेलुज हे घटक असतात.
        हे घटक पाणी शोषून घेतात व आतड्यात फुगतात. त्यामुळे मलाच्या वजनात व आकारमानात वाढ होते व त्यामुळे शौचास सहज व साफ होते. बद्धकोष्ठता असलेल्या रुग्णांनी खालील प्रमाणे आहार घ्यावा.
       दिवसातून तीन वेळा शिजवलेल्या भाजी पाल्याचे व फळाचे सेवन करावे.सकाळी उठल्यावर एक ग्लासभर कोमट पाणी प्यावे. तंतुमय आहाराबरोबर पाणी अधिक पिणे अतिशय म्हत्वाचे असते. याच बरोबर पाणी अधिक पिणे अतिशय महत्वाचे असते.याच बरोबर हलका व्यायाम करावा. त्याकाळात रेचके घेऊ नयेत.त्याने तत्काळ बरे वाटले तरी आतड्यावर दूरगामी वाईट परिणाम होतो.
       आशा नित्यक्रमाचा फायदा हळुहळु होऊ लागतो व शारीरिक लक्षणे बदलू लागतात. रुग्णास शौचास होऊ लागते. पोटातल दुखणे कमी होते. पोटातील फुगणे, डांबरने कमी होत जाते. काही रुग्णांना शिजलेल्या पालेभाज्या,फळे आहारात जास्ती घेणे शक्य नसेल तर ’इसबगोल ’ ऱात्रीच्या जेवणानंतर दहा मिनिटांनी एक चमचाभर पावडर ग्लासभर पाण्यात मिसळून घ्यावे. अतिसारच्या रुग्णांना आहारावर बंधने पाळावी लागतात. ह्या काळात चमचमीत अन्न पदार्थ टाळावेत. तसेच मद्यपान संपूर्णपणे निषिद्ध आहे.
       मेडीकल क्षेत्रात झपाट्याने झालेल्या प्रगतीमुळे व निरनिराळ्या अचूक अशी साधने उपलब्ध झाल्यामुळे आता पोटदुखीचे कारण सागणे डॉक्टरांना शक्य झाले आहे.