१ मे २०१० हा दिवस जागतिक गस्ट्रोएण्टरोलाजी संघटना " इनफ़्लमेटरी बावेल डिसीज डे " (आय. बी ड़ि ). म्हणून पाळला जाणार आहे . आय. बी ड़ि . होण्याच्या घटना भारतासह विकानशील देश्यामध्ये हळूहळू वाढत चालेल्या असल्याने या आजाराविषयी जागरूकता निर्माण करण्याकरिता सर्व देशांनी या माहितीपर कार्यक्रमा मध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे .(www.worldgastroenterlogy.org) आय . बी ड़ि . चे दोन प्रकार आहेत . एक आहे अल्सरेटीव्ह कोलायटीस आणि दुसरा कोहन्स डिसीज . अल्सरेटीव्ह कोलायटीस आणि कोहन्स डिसीज हे दोन्ही जुनाट रोग असून काही वर्ष ते दसकापर्यत ते राहू शकतात . सहसा त्याची सुरवात वयात येत असताना आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना होते .
        अल्सरेटीव्ह कोलायटीस मोठ्या आतड्याला सूज येते आणि अल्सर निर्माण होऊ शकतात. अल्सरेटीव्ह कोलायटीसमुळे कोवळ मोठ्या आतड्यावर परिणाम होतो . मात्र कोहन्स रोग तोंडापासून ते गुदद्वारपर्यंत पचन संस्थेच्या कोणत्याही अवयवाला होऊ शकतो . अल्सरेटीव्ह कोलायटीसमध्ये मोठ्या आतड्याच्या वरच्या आवारावर परिणाम होतो . तर कोहंस रोगामुळे लहान व मोठ्या आतड्याच्या संपूर्ण आवरला नुकसान पोहचू शकते .अल्सरेटीव्ह कोलायटीसमध्ये रेक्ट्म्ला (मोठ्या आतड्याची शेवटची काही इंच जेथे शरीरातून बाहेर पडण्यापूर्वी माल साठवली जाते ) सूज यायला सुरवात होते . अल्सरेटीव्ह कोलायटीसची नेहमी आढळणारी लक्षणे म्हणजे पोट दुखणे आणि रक्तमिश्रित जुलाब होणे . कोहंस रोग असलेल्या रुग्णांना सहसा पोटात दुखणे किवा क्रप्स येतात , जुलाब होतात आणि काही वेळा शोचामधून रक्त पडते ,ताप येतो आणि वजन घटते . कोहंस रोगात आतड्याच्या भिंतीच्या संपूर्ण जाडीवर परिणाम होत असल्याने ,अल्सरेटीव्ह कोलायटीसपेक्षा हा आजार अधिक गंभीर होऊ शकतो . कोहंस रोगात सूज आणि स्कार उती यामुळे आतड्याची भिंत जड होऊ शकते . यामुळे पचनासाठी येणाऱ्या अन्नचा मार्ग आकासतो . आशा प्रकारे आतड्याचा आकासलेल्या मार्गाला स्टिकचर असे म्हणतात . शिवाय खोलवर गेलेल्या अल्सरसचे रुपांतर ज्याला फिश्चुला म्हनतात आशा बोघ्द्यामध्ये होऊ शकतो जे आतड्याच्या निरनिराळ्या भागांना जोडतात . क्रोहंस रोगातून निर्माण होणाऱ्या अनेक गुंतागुंतीमध्ये फिशचुला निर्माण होणे हि रुग्णासाठी सर्वात त्रासदायक गोष्ट ठरू शकते कारण त्यामुळे जगण्याच्या गुणवतेवरच विपरीत परिणाम होतो आणि डॉक्टरासाठीहि हि सर्वात हताश करणारी गोष्ट ठरू शकते कारण या आजाराच्या व्यवस्थपानातील अपयशाचा दर खूप मोठा आहे . आय . बी ड़ि . आणि आय .बि .एस .(इरीटेबल बावेल सिण्ड्रोम) यात त्याची लक्षणे सारखी असू शकत असली तरी फ़रख आहे . इरिटेबल बावेल सिण्ड्रोममध्ये इनफ़्लमेटरी बावेल डिसिजप्रमाणे आतड्यांना सूज येत नाही किवा त्याचे नुकसान होत नाही .
        आय . बी ड़ि . एकाच कुटुंबातील साद्यासामध्ये दिसतो याचा अर्थ तो अनुवांशिक असू शकतो .आय . बी ड़ि . होण्यामध्ये गुणसुत्रे या आनुवाशिक घटकांची भूमिका असते .तणाव आणि विशिट प्रकारचे अन्न खाल्याने आय .बी ड़ि. होत नाही ,मात्र या दोन्हीमुळे आय .बी ड़ि. लक्षणे अधिक तीव्र होऊ शकतात .
       आय .बी ड़ि. चे उत्तम निदान हे कोलोनोस्कॉपीने होऊ शकते .एका टी. व्ही . मॉनिटरला लांब ,बारीक टयूब जोडलेली असते जी गुद्दावारामधून शरीरात घातली जाते आणि मोठ्या आतड्याचे आतील आवरण व छोट्या आतड्याचा काही भाग त्यातून बगता येतो .तपासणी करत असताना डॉक्टर बायोपसी करू शकतात ज्यात कोलनच्या भागातून उर्तीचा एक छोटा नमुना घ्यावा लागतो ज्याचे मायक्रोस्कोपखाली निदानाची खात्री करून घेण्याकरिता निरीक्षण करता येते .
      एके काळी आपल्या भारतात हा आजार कवचित होणारा आजार म्हणून मनाला जात असे .पण भारतातील बहुतेक गसट्रोएन्टरोलोजीस्टिककडे आय . बी ड़ि. अधिकाधिक केसेस येऊ लागल्या आहेत .भारतात क्रोहंस रोगापेक्षा अल्सरेटिव्ह कोलायटिस आटपट अधिक प्रमाणात होतो . आपल्या भागात आय . बी ड़ि. चे प्रमाण वाढण्याची अनेक कारणे आहेत .
१. सर्व मुख्य हॉस्पिटल आणि खाजगी दवाखाण्यामध्ये व्हीडिओ कोलोनो स्कोपीसारखी आधुनिक यंत्रणा सहजी उपलब्ध झाली आहे
२. या अवस्थेचे अगदी सुरवातीच्या काळात निदान करण्यासाठी तज्ञ उप्लाब्थ आहेत .पुर्वि ,गुदद्वारातून रक्त पडल्यास ते मुळव्याध मुले असू शकते असे मानले जायचे आणि त्या दुर्शिटिने त्यावर उपचार होत .पण आता असे लागले आहे कि असे रक्त पडण्याचे कारण आय . बी ड़ि . सुद्धा असू शकते .
३. स्वचेतेचे कारण. हा विरोधाभास आहे ,पण हे खरे आहे कि दरडोई उत्पन्न वाढले आणि स्वचाता सुधारली तशा आपल्या देश्यातील क्रोहंस रोगाच्या घटनाही वाढू लागल्या य़चे कारण असे कि सुश्म जंतू आणि जीवाणू अस्वच पाण्यावाटे किवा लहानपणी असलेल्या आजूबाजूच्या अस्व्चेतेमुळे शरीरात जात आणि शरीराची प्रतिकार शक्ती वाढत असे .आशा प्रकारे लहानपणी मिळालेली प्रतिकारशक्ती दशकानुदशके टिकून राहते आणि पुढे वय वाढल्यानंतर हे जंतू शरीरात गेले तरीही त्यांनी इजा करण्यापासून व्यक्तीचे सरक्षण करण्यात महत्वाची भूमिका पार पाडते . मात्र स्वचेतेचा दर्जा सुधारल्याने आणि या जंतू पासून मुक्त पाणी मिळु लागल्याने लहान असताना शरीराचा अशा सुष्म जीवनुशी संबधच आला नाही ,तर भक्कम अशी प्रतिकार शक्ती निर्माण होत नाही ज्यामुळे या जिवणुशि सामना करण्याची क्षमता निर्माण होत नाही व पुढच्या वयात आतड्याचे नुकसान होऊ शकते .